Slide Two

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे

कै. गजानन भिवराव देशपांडे विद्यालय

बारामती, जि. पुणे - 413102

Slide Two
PlayPause
previous arrow
next arrow

म.ए.सो. कै.गजानन भिवराव देशपांडे विद्यालय, बारामती

Late Gajanan Bhiwarao Deshpande Vidyalaya

23 जून १९८६ रोजी शाळा सर्वप्रथम शाळेच्या सभागृहात भरत होती सन १९८६ रोजी छोटा गट, मोठा गट व इ. १ लीचा वर्ग सुरु झाला.त्या वर्षी छोट्या गटात २५ व मोठ्या गटात २८, इयत्ता पहिलीला २१ अशी विद्यार्थी संख्या होती. सन १९८९ पासून हे वर्ग कन्या प्रशालेत भरू लागले. सन १९९० रोजी म.ए.सो. मुलांचे हायस्कूल मध्ये वर्ग भरू लागले. सन १९९१ रोजी शाळेची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली.शाळेच्या इमारतीच्या एकूण सहा वर्ग खोल्या बांधण्यात आल्या ..

Read More →

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि ..
Visit MES Website →

मएसो डॉक्युमेंटरी

Mes Founder

आमच्याबद्दल

म.ए.सो बद्दल
१८६० मध्ये, तीन महान दूरदर्शी – वामन प्रभाकर भावे , वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी एकत्र येऊन एका कल्पनेचे बीज रोवले. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा ..
अधिक वाचा →

Principle Dhananjay Melkundeमुख्याध्यापक मनोगत
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेली आपली गजाननराव भिमराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारामती ही प्रशाला प्रत्येक विद्यार्थ्याला ..
अधिक वाचा →

Committeeशाला समिती
स्थानिक सल्लागार समिती, शाला समिती, विद्या समिती आणि शालेय प्रशासन ..
अधिक वाचा →

सुविधा
शालेय मैदान, रनिंग ट्रॅक, घोष पथक व ढोल पथक, प्रयोगशाळा, एन.सी.सी. युनिट, तंत्रशिक्षणाची सोय, ई-लर्निंग, प्रशस्त वर्ग व सुसज्ज सभागृह, इंग्रजी संभाषणासाठी मार्गदर्शन ..
अधिक वाचा →

शाळेची वैशिष्ट्ये
शालेय मैदान : क्रीडावर्धिनी दररोज ३५० ते ५०० विद्यार्थी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत उपस्थित राहून सराव करतात. क्रीडावर्धिनीसाठी ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक उपलब्ध आहे ..
अधिक वाचा →

निकाल
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कै. ग. भि.देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती इ.12 वी निकाल 2023-24 ..
अधिक वाचा →

बातम्या आणि अद्यतने

सूचना / बातम्याकॅलेंडर

फोटो गॅलरी

gallery (4)
gallery (1)
gallery (2)
gallery (3)

‘पावनखिंड दौड’

  “बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘पावनखिंड दौड’चे यशस्वी आयोजन.”

छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मावळे आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘पावनखिंड दौड’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा भारती आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. ग. भि. देशपांडे विद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाचे शाला समिती अध्यक्ष मा.अजय पुरोहित , महामात्र मा. डॉ. गोविंद  कुलकर्णी व क्रीडा भारती पुणे चे अध्यक्ष मा. शैलेश आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी मा.श्री. किशोर कानिटकर , मा. श्री. धनंजय क्षीरसागर, मा. श्री. संदीप देशपांडे, मा. श्री. पुरुषोत्तम कुलकर्णी, मा. श्री. राजीव देशपांडे , मा. श्री. गौतम जाधव, राष्ट्रीय सायकल सायकलपट्टू कु. राधिका दराडे, मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे व शालेय पदाधिकारी उपस्थित होते .

या दौडीत विद्यार्थ्यांसह शिक्षक, संस्था पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पावनखिंडच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण करून देणारी ही दौड देशभक्तीचा संदेश देणारी ठरली. उपस्थितांनी “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवप्रेम जागवू या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर व्याख्याते मा. विवेक पांडकर यांनी  पावनखिंड पराक्रमाची शौर्यगाथा त्यांच्या व्याख्यानात विद्यार्थ्यांसमोर सादर केली . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी क्रीडा भरतीचे अध्यक्ष मा. शैलेश आपटे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आयोजनामाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. किशोर कानिटकर यांनी पावनखिंड दौड मध्ये भाग घेतलेल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पावनखिंड या ठिकाणी घडलेल्या या शौर्यगाथेबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. ऐतिहासिक दौड उपक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय, हरिभाऊ गजाननराव देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल, जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय तसेच सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा या शाळांच्या ५६१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  ‘पावनखिंड दौड’मुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमानाची भावना निर्माण झाली असून, हा उपक्रम स्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल गोंजारी व आभार क्रीडाशिक्षक अनिल गावडे यांनी मानले


This will close in 20 seconds

Scroll to Top