नमस्कार,
आपल्या वेबसाईट च्या माध्यमातून मुख्याध्यापिका या नात्याने अभिव्यक्त होताना मला अतिशय आनंद होत आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेली आपली गजाननराव भिमराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारामती ही प्रशाला प्रत्येक विद्यार्थ्याला देशाचा सक्षम व सज्जग नागरिक बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रशालेत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, महाराष्ट्राची संस्कृती जपणारी दीपोत्सव ,लेझीम पथक, ढोल पथक ,भोंडला यासारखे विविध उपक्रम राबवणारी तालुक्यातील एक उपक्रमशील प्रशाला म्हणून प्रशालेचा लौकिक वाढत आहे.
आजच्या या वेगवान स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा व अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश संपादन करीत आहे. शासकीय सेवा क्षेत्र व अन्य सामाजिक क्रीडा आर्थिक क्षेत्रात विद्यार्थी यशस्वी होऊन अनेक उच्च पदांपर्यंत पोहोचत आहेत याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये आपले व शाळेचे नाव उज्वल करणारे व परत शाळेवर जीवापाड प्रेम करणारे माजी विद्यार्थी हीच शाळेची खरी संपत्ती आहे
यावर्षी प्रशालेत माजी विद्यार्थी मिळावे होत आहेत. आपली प्रशाळाची कृतज्ञता म्हणून माजी विद्यार्थी विविध प्रकारचे सहाय्य करीत आहेत यांचे हे प्रेम असेच वृद्धिंगत होत राहो अशी अपेक्षा करते.
आज ज्ञानाची क्षितिजी रुंदावत आहेत उच्च शिक्षणासाठीच्या प्रवेश परीक्षांमध्ये प्रशालेतील विद्यार्थी कुठे कमी पडू नये म्हणून प्रशातील ‘ब्रीज कोर्स’ सारखे उपक्रम सुरू केला आहे. त्यांचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत अशा या सर्व गुणवान विद्यार्थी व शिक्षकांच्या लेखनातून त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार या वेबसाईटच्या माध्यमातून अनुभवता येईल.
शाळेच्या यशाच्या वाटचालीत संस्थेचे मान्यवर, पदाधिकारी, स्थानिक सल्लागार समिती, सदस्य, समन्वयक ,प्रशातील पदाधिकारी ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, हितचिंतक या सर्वांचे सर्वप्रथम मी कृतज्ञता व्यक्त करते .
मनःपूर्वक धन्यवाद
मा.सौ.रोहिणी गायकवाड
मुख्याध्यापिका