संस्थेच्या १६० व्या वर्धापन दिनानिम्मित आयोजित अभिवादन यात्रा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या आपल्या संस्थेस १६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व बारामतीतील कै.ग.भि.देशपांडे विद्यालयाला १०८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल म.ए.सो विद्यालाय,सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथ.शाळा व हरिभाऊ देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल बारामती या तीनही शाळेच्या वतीने एकत्रित भव्य अभिवादन यात्रेचे १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत करण्यात आले.ज्ञानरथ सजविण्यात आला होता.या प्रसंगी उद्घाटनास नगराध्यक्षा सौ.पोर्णिमा तावरे. श्री.राजीवजी देशपांडे उपस्थितीत होते.भव्य फेरीच्या माध्यमातून संस्थेच्या व शाळेच्या वैशिष्ठ्याचा प्रचार व प्रसार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या समारोपा वेळी पोलीस आयुक्त श्री.इसाक बागवान (माजी विद्यार्थी) उपस्थितीत होते.

Run for health

दि. ३० व ३१ जानेवारी Run for health मेरेथोन घेण्यात आली.या स्पर्धेत एकुण २५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी श्री.संजय जाधव(गटशिक्षणाधिकारी), श्री.औदुंबर पाटील(P.S.I बारामती) सौ.डॉ.साळुंखे, डॉ. वाघमोडे, श्री.गोविंद कुलकर्णी(महामात्र), श्री.शैलेश आपटे(क्रीडावार्धिनी समन्वयक)स्थानिक सल्लागार समितीचे श्री.राजीवजी देशपांडे, श्री राजकुमार छाजेड व प्रशालेचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.

ढोल पथक

विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच एकता व सामाजिक बांधिलकी जोपासणे या हेतूने क्रीडावार्धिनी अंतर्गत ढोलपथक सुरु आहे.

गोफ पथक

प्रशालेत १२ पदरी गोफ पथक सुरु करण्यात आले आहे.यामध्ये ४८ विदयार्थी सहभागी असतात.

लेझीम पथक

शिवाजी महाराजांच्या काळापासून महराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळला जाणारा खेळ म्हणजे लेझिम खेळ प्रशालेत ३०० मुला मुलींचे लेझीम पथक बसविले आहे. यात स्वस्तिक, कमळ, सूर्यनमस्कार, मानवी मनोरे अशा संरचना बसविण्यात आल्या आहेत.

१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय सणास ढोल, लेझीम व गोफ पथकांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते.

म.ए.सो.च्या ग.भि.देशपांडे विद्यालय बारामती येथे आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
दि.२१ जून २०२४
योगदिनी तीन हजार विद्यार्थ्यांनी केला सामूहिक योगाभ्यास
सामूहिक योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
बारामती(ता. २१ जून) : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. ग. भि. देशपांडे माध्य. विद्यालयात तीन हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सामूहिक योगाभ्यास करून आंतरराष्ट्रिय योगदिन साजरा केला . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्याधापक श्री. दिगंबर मोहोळकर व माजी शिक्षक श्री. रमेश झाडबुके उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड, उपमुख्याध्यापक श्री. राजाराम गावडे , पर्यवेक्षक श्री. शेखर जाधव , श्री. दिलीप पाटील उपस्थित होते .
प्रशालेच्या भव्य अशा मैदानावर तीन हजार विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी एकाच वेळी योग प्रात्यक्षिके केली . विद्यालयाचे योगशिक्षक श्री. दादासाहेब शिंदे यांनी ताडासन , वृक्षासन , त्रिकोणासन , वीरभद्रासन , पद्मासन, बद्धकोणासन, वज्रासन, शशांकासन , कपालभाती , शुद्धीकरण क्रिया , भ्रामरी प्राणायाम , ओमकार , सूर्यनमस्कार यांची सामुहिक प्रात्यक्षिके करून घेतली . प्रात्यक्षिकांचे विवेचन क्रीडाशिक्षक श्री. अनिल गावडे यांनी केले .
योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांच्या सर्व शक्ती ईश्वराशी जोडणे होय . योग म्हणजे बुद्धी , मन , भावना आणि संकल्प यांचे नियमन . शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने व प्राणायाम करणे गरजेचे आहे असे विचार प्रमुख पाहूणे श्री. दिगंबर मोहोळकर यांनी व्यक्त केले. यावेळी श्री. रमेश झाडबुके यांनीही मनोगत व्यक्त करून हास्ययोग घेतला . उपमुख्याध्यापक श्री. राजाराम गावडे यांनी मनोगतात योगाभ्यासाचे महत्व सांगून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमास संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे , प्रशालेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी , शाला समितीचे अध्यक्ष मा. अजय पुरोहित , नियामक मंडळ सदस्य मा. राजीवजी देशपांडे , क्रीडावर्धिनी अध्यक्ष श्री. विजय भालेराव , क्रीडावर्धिनी महामात्र श्री. सुधीर भोसले, क्रीडावर्धिनी समन्वयक श्री.शैलेश आपटे , सल्लागार सदस्य मा.फणेंद्र गुजर , शाळा समन्वयक मा. पुरुषोत्तम कुलकर्णी आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कुमार जाधव यांनी केले . सूत्रसंचालन श्री. सनतकुमार खोत यांनी तर आभार श्री. गणपत जाधव यांनी मानले .

कृतज्ञता निधी अभियान २०२४