शालेय मैदान : क्रीडावर्धिनी दररोज ३५० ते ५०० विद्यार्थी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत उपस्थित राहून सराव करतात.
क्रीडावर्धिनीसाठी ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक उपलब्ध आहे
शालेय गृहभेट योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. शालेय गृहभेटीची दरमहा विद्यार्थी नोंदणी करण्यात येत आहे.
सर्व शिक्षकांमार्फत इ.११ वी अॅडमिशन मागील इ.१०वी ६१४ विद्यार्थ्यांना भेटी देऊन व चर्चा करून संख्या वाढविण्यात यश आले आहे.
बारामती परिसरातील ज्या शाळांना उच्च माध्यमिक विभाग जोडलेला नाही अशा शाळांना निवडक शिक्षकांमार्फत इ.१०वीच्या विद्यार्थी व शिक्षकांना शाळेसंबंधी व शाळेच्या वैशिष्ट्यासंबंधी मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थी संख्या वाढविण्यात यश आले.
सर्व सोयनियुक्त घोष पथक व ढोल पथक यशस्वीपणे मुला-मुलींसाठी कार्यान्वित आहे.
महाराष्ट्रातील अतिशय उच्च दर्जाची जुनी व सुसज्ज प्रयोगशाळा
भारतीय सीमेवरील जवानांना साधारणपणे दोन हजार राख्या सैनिकांमार्फत सीमेवर पाठविल्या.
संत सोपानदेव व संत तुकाराम पालखी सोहळ्यासाठी शाळेने दिंडी व स्वच्छ अभियान यशस्वीपणे राबविले.
शासन मान्य उपक्रम अंतर्गत शालेय स्तरावर वृक्षलागवड करण्यात आली. हरितसेनेत सुमारे २०० विद्यार्थ्यांची सदस्य म्हणून नोंद करण्यात आली.
एन.सी.सी. युनिट मार्फत ५० वृक्षाची शालेय आवारात लागवड करण्यात आली.
इ.८ वी पासून शालेय पातळीवर तंत्रशिक्षणाची सोय उपलब्ध
अनाथ विद्यार्थ्यांसाठी रिमांडहोम बारामती येथे रक्षाबंधनाचे आयोजन केले.
स्काऊट व गाईड मेळाव्यात ६० गाईडचा सक्रीय सहभाग. समूहगीत स्पर्धेत प्राथन क्रमांक मिळवला.पाणी वाचवा देश वाचवा या प्रकारचे पथनाट्य सादर केले.
गणेश चतुर्थीनिमित्त ५०० गणेश मूर्ती मुलांच्या मार्फत तयार करण्याचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.