माजी विद्यार्थी सत्कार सोहळा 2010 बॅच
म ए सो चे कै ग भि देशपांडे विद्यालया दिनांक 30/8/2024
वार शुक्रवार रोजी प्रशालेचा सभागृह २०१० माजी विद्यार्थी श्री तेजस सुरेश पांढरे यांची सी आय एस एफ इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असिस्टंट कमांडर म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.त्याच्याशी 2019 UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सेंट्रल आर्मी पोलीस फोर्स ACS या परीक्षेत यश मिळवून असिस्टंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली या पदा अंतर्गत ओरिसा झारखंड जम्मू-काश्मीर या ठिकाणी सुपरवायझर ऑफिसर म्हणून कार्य केले. अशा या कर्तुत्ववान माजी विद्यार्थी श्री तेजस पांढरे यांचा सत्कार प्रशालेतर्फे घेण्यात आला
श्री तेजस पांढरे यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तर रूपाने संवाद साधला यांच्या यशात शाळेचा मोलाचा वाटा आहे शाळेतील गुरुवर्यांकडून प्रामाणिकपणा,’सचोटी ‘शिस्त ,संस्कार, यांच्या शिदोरीवर निवड झाली तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आधी दहावी बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व त्यासाठी कमीत कमी मोबाईल व जास्तीत जास्त स्वतःचे वाचन आणि मुद्दे काढणे यावर भर देणे आपल्या क्षमतेप्रमाणे मिळालेला यशाचा आनंद घेऊन सकारात्मक विचार करावा कोणत्याही यशासाठी सकारात्मक व सुजनशील विचार खेळ व्यायाम व शारीरिक स्वास्थ्य हे महत्त्वाचे आहे नियुक्त पदासाठी मुलाखतीचा अनुभव सांगताना शाळेतून मिळालेल्या संस्काराचा उपयोग कसा झाला ते सांगितले विद्यार्थ्यांच्या शोधाची जननी असते हे मनोगतातून व्यक्त केले व सर्व गुरुवर्य प्रति कृतज्ञता व्यक्त केली तसेच तेजस पांढरे यांच्याकडे भारतीय जवानांसाठी प्रशालेच्या विद्यार्थिनी 1400 राख्या व संदेश यांचे समर्पण करण्यात आले या कार्यक्रमास माननीय मुख्याध्यापिका सौ रोहिणी गायकवाड मॅडम उपमुख्याध्यापक श्री आर डी गावडे सर श्री जाधव सर श्री पाटील सर उपस्थित होते माननीय मुख्याध्यापिका सौ गायकवाड मॅडम यांनी श्री तेजस यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ चिंधे स्वागत परिचय सौ घोडके आभार श्रीमती कुंभार कार्यक्रमाचे नियोजन सौ देशपांडे व सूत्रसंचालन श्री कदम सर यांनी केली

