उपक्रम २०२५-२६
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख, इतिहासाची साक्ष आणि सामाजिक जाणिवेचा सशक्त आधारस्तंभ आहे. मराठी साहित्याने समाजमन घडवले, विचारांना दिशा दिली आणि पिढ्यान्पिढ्या माणुसकीची मशाल प्रज्वलित ठेवली आहे. याच साहित्यपरंपरेचा साक्षात्कार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावा, मराठी भाषेचा गौरव त्यांच्या मनात खोलवर रुजावा आणि नव्या साहित्यिक प्रवाहांचा परिचय व्हावा, या उदात्त हेतूने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती येथील विद्यार्थ्यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास, सातारा येथे शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.
ही क्षेत्रभेट म्हणजे केवळ सहल नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीची एक वैचारिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक यात्रा होती. प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली ही संमेलन क्षेत्रभेट यशस्वीपणे पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याविषयी प्रेम, सामाजिक जाणीव आणि भाषिक अभिमान निर्माण व्हावा, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू होता.
सातारा नगरीत भरलेल्या या साहित्य संमेलनाच्या परिसरात प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या मनात एक वेगळाच उत्साह संचारला. साहित्यिक वातावरण, विविध दालनांमधील पुस्तके, विचारवंतांचे विचार, कवींच्या शब्दांतून उमटणारी संवेदना आणि साहित्यिक चर्चांचा गहिरा आशय या सर्वांनी विद्यार्थ्यांचे मन भारावून गेले. मराठी साहित्याची व्यापकता आणि त्यामधील वैविध्य प्रत्यक्ष अनुभवण्याची ही संधी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मौल्यवान ठरली.
संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध साहित्यिकांचे विचार ऐकायला मिळाले. सामाजिक प्रश्न, समकालीन वास्तव, भाषा व संस्कृतीचे महत्त्व, परिवर्तनशील साहित्याची भूमिका अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी चिंतन केले. साहित्य केवळ शब्दांचा खेळ नसून ते समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात दृढ झाली. वाचनसंस्कृती जपण्याचे महत्त्व आणि विचारशील नागरिक घडवण्यात साहित्याची भूमिका याचीही प्रचिती त्यांना आली.
या साहित्य संमेलन क्षेत्रभेटीच्या निमित्ताने शाळा समितीचे अध्यक्ष मा. श्री. अजयजी पुरोहित तसेच महामात्र मा. प्रा. डॉ. श्री. गोविंदजी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “विद्यार्थ्यांनी साहित्यिक व सांस्कृतिक अनुभव प्रत्यक्ष घेतले पाहिजेत; अशा अनुभवांतूनच त्यांच्या विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या शुभेच्छांनी विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.
या क्षेत्रभेटीदरम्यान श्री. सोमनाथ गावित, श्री. मधुकर राठोड, श्री. स्वप्नील गोंजारी हे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले, संमेलनातील विविध उपक्रमांची माहिती समजावून सांगितली आणि प्रत्येक विद्यार्थ्याने या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले. शिक्षक–विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद, आपुलकी आणि मार्गदर्शनामुळे ही क्षेत्रभेट अधिक अर्थपूर्ण ठरली.
विद्यार्थ्यांसाठी ही भेट म्हणजे केवळ पाहणे नव्हे, तर अनुभवणे, विचार करणे आणि आत्मसात करणे अशी एक समृद्ध प्रक्रिया होती. अनेक विद्यार्थ्यांनी विविध साहित्यप्रकारांची पुस्तके पाहिली, लेखक–कवींच्या विचारांशी परिचय साधला आणि भविष्यात अधिक वाचन करण्याची प्रेरणा घेतली. काही विद्यार्थ्यांच्या मनात लेखन, कविता, कथालेखन याविषयी नव्याने आवड निर्माण झाली, तर काहींना सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली.
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही केवळ एक सांस्कृतिक घटना नसून मराठी भाषेच्या अस्तित्वाचा, तिच्या वैभवाचा आणि भविष्याचा उत्सव आहे. या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दलचा अभिमान अधिक दृढ झाला. “मराठी ही ज्ञानाची, संवेदनांची आणि माणुसकीची भाषा आहे,” ही भावना त्यांच्या मनात रुजली.
ही साहित्य संमेलन क्षेत्रभेट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात एक संस्मरणीय अनुभव ठरली. पुस्तकांपलीकडील ज्ञान, प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारी शिकवण आणि सांस्कृतिक जाणिवेची जडणघडण या सर्व दृष्टीने हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. भविष्यातही अशा साहित्यिक व शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध व्हावे, मराठी साहित्य जपणे, वाढवणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्या दिशेने उचललेले हे एक पाऊल निश्चितच अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरेल.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती यांच्या मार्फत ‘पंचपरिवर्तन - 'स्वबोध' या विषयाची शिक्षकांसाठी कार्यशाळा’ प्रशालेत आयोजित करण्यात आली.
"पंचपरिवर्तन स्वबोध म्हणजे आपल्या जीवनातील विचार, वाणी, वर्तन, व्यसन आणि वृत्ती या पाचही गोष्टींमध्ये विधायक बदल करून आत्मजागृती साधने होय."
या कार्यशाळेची सुरुवात श्री. अमोलजी रघुनाथराव देशमुख, (असोसिएट व्हॉइस प्रेसिडेंट, भारत फोर्ज.) यांच्या बीजभाषणाने झाली.
'आपण ज्या संस्कृतीत राहतो त्याचे आकलन होणे गरजेचे, सामूहिक चिंतनातून स्वबोधाचा विकास आणि विचार व्हावा. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण, नागरी शिष्टाचार व स्वबोध यातून संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी, नागरिक म्हणून आपण कोणती कर्तव्य पार पाडली पाहिजे याचे आत्मचिंतन प्रत्येकाने करावे. आपल्या संस्कृतीबद्दल, आपले आदर्श यांच्या प्रति आपण अभिमान बाळगायला हवा. आपल्या प्रगतशील संस्कृतीने संपूर्ण विश्वाला वंदनीय ठरेल अशा परम वैभवावर आपल्या देशाला न्यावे लागेल त्याचप्रमाणे समाज परिवर्तन करण्याचे समाजाला प्रेरणा देण्याचे काम आपणास इथून पुढील काळात करावे लागेल. आपणा सर्वांना जांबुवंताच्या भूमिकेतून आपल्या विद्यार्थ्यांसाठी काम करावे लागेल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये, "कुटुंबापुरता विचार न करता समस्थाचा विचार करावा, आपल्या कुटुंबात तसेच परिसरात स्वबोधा विषयी जाणीव-जागृती व्हावी. मानवी जीवनात आत्मजागृती, स्वबोध आणि आत्मोन्नतीसाठी विविध साधना सांगितल्या आहेत. त्यामधील पंचपरिवर्तन स्वबोध ही एक जीवनाला नवीन दिशा देणारी संकल्पना आहे," असा मनोदय प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे सर यांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेसाठी शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री. अजय जी पुरोहित सर आणि प्रशालेचे महामात्र मा. डॉ. श्री. गोविंद जी कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गिरीश कदम सर यांनी केले. पाहुण्याचे स्वागत, परिचय श्री. अमित पाटील यांनी करून दिला तसेच सांघिक पद्य देखील त्यांनी सांगितले. तसेच आभार श्री. श्रीयश सकोजी सर यांनी मानले.
२१ जून २०२५ रोजी म. ए. सो.चे कै.ग.भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी, क्रीडा भारतीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. संजयजी पुरंदरे सर (MS सर्जन) उपस्थित होते. त्यांनी शरीर सुदृढ व बळकट होण्यासाठी नियमित व्यायाम, योगा प्राणायाम आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी आहार व व्यायामाकडे लक्ष द्यावे हा संदेश दिला. भारताने ज्ञान व आयुर्वेदाची देणगी जगाला दिलेली आहे हे मनोगतातून व्यक्त केले.
संस्था व प्रशालेचे समन्वयक श्री. पुरुषोत्तम कुलकर्णी सर उपस्थित होते. प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. धनंजय मेळकुंदे सर यांनी मन, मनगट व मेंदू सक्षम होण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे हे प्रास्ताविकातून व्यक्त केले. योगदिनानिमित्त
योग प्रार्थना,
पूरक हालचाली, सूर्यनमस्कार मंत्रासह, सूर्यनमस्कार,
आसनांमध्ये उभ्या स्थितीतील- त्रिकोणासन ताडासन ,
बैठ्या स्थितीतील -पद्मासन बालासन, कपालभाती प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, क्लॅपिंग थेरपी, शांती मंत्र हे क्रीडाशिक्षक श्री. दादासाहेब शिंदे सर व श्री. अनिल गावडे सर यांनी घेतले. यावेळी संस्था व प्रशालेचे समन्वयक श्री. पुरुषोत्तम कुलकर्णी सर, मा. मुख्याध्यापक श्री. धनंजय मेळकुंदे सर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता तावरे मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर मॅडम, पर्यवेक्षक श्री. दिलीप पाटील सर, श्री. शेखर जाधव सर, सौ. जयश्री शिंदे मॅडम उपस्थित होत्या. स्वागत व परिचय सौ. मोहिनी देशपांडे, सूत्रसंचालन श्री. स्वप्नील गोंजारी व आभार श्री. अनिल गावडे यांनी मानले.
'पंचकोशाच्या चष्म्यातून सर्व जगाकडे पहिले तर मातृभूमीचा नवलौकिक वाढेल!'
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती आणि शिक्षक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचकोषाधारीत व्यक्तिमत्व विकसन कार्यशाळा प्रशालेत आयोजित करण्यात आली.
ज्ञान प्रबोधिनीच्या अनेक शैक्षणिक प्रयोगांपैकी पंचकोश विकसन शिक्षण प्रणालीचा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या कार्यशाळेची सुरुवात पंचकोषाधारीत व्यक्तिमत्व विकसन तसेच शिक्षणातील भारतीय तत्त्वविचार या विषयावरील गुरुकुल विभाग प्रमुख मा. प्रा. श्री. आदित्य शिंदे सर
यांच्या बीजभाषणाने झाली.
"सहवेदना आणि समवेदना समजून घेण्याची कुवत निर्माण करणं म्हणजे व्यक्तीमत्व विकसन!
विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि संस्था संचालक हे ज्यावेळी शाळा म्हणजे विद्येच मंदिर असं मानून शाळेत प्रवेश करतील तिथे आपोआप सहज शैक्षणिक वातावरण निर्माण होईल! असे प्रतिपादन त्यांनी केले.
वस्तू वास्तू आणि व्यक्ती यांचा मूक संवाद यातून आमच्या शिक्षकांना एक नवा प्रयोग आपल्या अध्यापनात कसा करता येऊ शकतो, याचा अनुभव घेता आला.
"नवीन शैक्षणिक धोरणाची नेमकी दिशा काय आहे आणि आलेल्या मान्यवरांचे विचार यामुळे आमच्या शिक्षकांच्या मनातील विचारांमध्ये निश्चितच मौलिक भर पडेल," असा विश्वास प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे सर यांनी व्यक्त केला.
शैक्षणिक- बौद्धिक- सामाजिक सर्वच स्तरावर आदर्शवत असणाऱ्या वक्त्यांकडून 'पंचकोश विकसन' आणि त्याचा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी असणारा थेट संबंध प्रत्यक्ष श्रवणानुभवातून समजून घेता आला.
या कार्यशाळेसाठी प्रशालेतील शिक्षकवृंद बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री. अजय जी पुरोहित सर आणि प्रशालेचे महामात्र मा. डॉ. श्री. गोविंद जी कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रास्ताविक श्री. संजय आटोळे सर यांनी केले. परिचय व स्वागत श्री. श्रीयश सकोजी सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गिरीश कदम सर यांनी केले. तर आभार श्री. रवींद्र गडकर सर यांनी मानले.
म.ए.सो.चे कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,बारामती. स्त्री शिक्षणाची जननी आणि अज्ञान- अंधश्रद्धेच्या काळोखात ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मुलांच्या दुपार विभागांमध्ये अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. ३ जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो, यांचेच औचित्य साधून आज विद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाईंना पुष्पहार अर्पण करून झाली,यावेळी व्यासपीठावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष व विभागाचे पर्यवेक्षक श्री.शेखर जाधव, ज्येष्ठ शिक्षक श्री.अभिमन्यू गंभीरे, ज्येष्ठ शिक्षक श्री.रेवणनाथ मिसाळ कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. गिरीष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
सावित्रीबाईंच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री.गिरीश कदम यांनी अतिशय सविस्तरपणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी विद्यालयात साजऱ्याकरण्या पाठीमागिल उद्देश विद्यार्थ्यांना समजावून सांगितला,तसेच सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याची ओळख आपल्या मनोगतातून व्यक्त केली.आज मुली शिक्षण घेत आहेत, मोठ्या पदावर काम करत आहेत, आज हे सर्व खूप सोपं वाटते,पण १८ व्या शतकात ( सावित्रीबाईंच्या काळामध्ये) स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे दुय्यम दर्जाचे मानले जात असे, अशा परिस्थितीत ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिकल्या आणि त्यांनी स्त्री शिक्षणाची दारे समाजातील प्रत्येक स्त्रीसाठी खुली करून दिली. स्त्रिया आज चंद्रावरती पोचल्या आहेत, तरीही समाजातील स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, असुरक्षितता असे प्रश्न आजही शिल्लक आहेत. सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली तेव्हाच ठरेल,जेव्हा प्रत्येक मुलगी शिकेल, स्वावलंबी होईल, व अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल,असे विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.शेखर जाधव यांनी देखील आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच, सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित " तयास मानव म्हणावे का? " ही कविता सादर केली.
यावेळी इयत्ता ८वी विशाळगड या वर्गातील विद्यार्थी चि. विघ्नेश काळंगे, चि. हर्षद शेंडे, चि.वीर जगताप या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चि.अनिरुद्ध दुरुगकर याने केले, सूत्रसंचालन चि. प्रतीक पाडवी याने केले,तसेच कार्यक्रमाचे आभार चि.श्रेयश कदम याने मानले. या कार्यक्रमास विभागातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता ८ वी विशाळगड या वर्गाने केले, त्यांना वर्गशिक्षक श्री.मधुकर राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री.धनंजयजी मेळकुंदे, प्रशालेचे महामात्र मा.डॉ.श्री.गोविंदजी कुलकर्णी आणि शाला समिती अध्यक्ष मा.श्री.अजयराव पुरोहित यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला, सर्वांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रम संपन्न झाला.

शाळा आमुची, आम्ही शाळेचे
तन मन धन शक्तीने घडवू राष्ट्र उद्याचे
दिनांक 30/ 6 /2025 रोजी म.ए.सो.चे कै.ग.भि.देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारामती. या ठिकाणी कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी नियामक मंडळ म. ए. सोसायटी, पुणे अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब शिंदे, शाला समिती, बारामती अध्यक्ष माननीय श्री अजय पुरोहित, शाला समिती ,बारामती महामात्र माननीय श्री गोविंद कुलकर्णी, स्थानिक सल्लागार समिती ,सदस्य माननीय श्री अशोक प्रभुणे, माननीय श्री राजीव देशपांडे माननीय श्री फनेंद्र गुजर ,संस्था व शाळा समन्वयक माननीय श्री पुरुषोत्तम कुलकर्णी ,प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री धनंजय मेळकुंदे, माजी मुख्याध्यापिका माननीय सौ रोहिणी गायकवाड, इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका माननीय सौ सोनाली क्षिरसागर ,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. मोनिका खेडलेकर ,पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका माननीय सौ अनिता तावरे ,प्रशालेचे पर्यवेक्षक माननीय श्री शेखर जाधव माननीय श्री दिलीप पाटील ,माननीय सौ जयश्री शिंदे मान्यवर उपस्थित होते.
प्रशालेची महामात्र माननीय डॉ.श्री गोविंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले की कृतज्ञता निधी उपक्रमास माजी विद्यार्थ्यांचे भरघोस योगदान लाभले. ही प्रशाला म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची शाळा, शाळेची दगडी इमारत, दगडी चिरा, शाळेचा प्रत्येक चिरा म्हणजे एक विद्यार्थी. आपली प्रशाला तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करते. त्यांना जीवनात यशस्वी करण्यासाठी ज्ञानाची शिदोरी देते. हेच विद्यार्थी म्हणजे भविष्यातील शाळेचा खंबीर आधारस्त्रोत आहेत.
प्रशालेवर भरभरून प्रेम करणारे काही माजी विद्यार्थी यांनी प्राथमिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये श्री शिवरत्न कुंभार, सौ रजनी सुर्वे ,श्री दत्तात्रय सायकर ,श्री ओंकार वारे यांनी शाळेमुळे आम्ही घडलो नावारूपाला आलो. या शाळेचे आम्ही सदैव ऋणी आहोत व शाळेच्या नेहमी ऋणात राहू अशी भावना व्यक्त केली. त्यांना शिकवत असलेल्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला. म .ए. सो .चा विद्यार्थी वर्ग म्हणजे बारामतीचा आधारस्तंभ. हे मनोगतातून व्यक्त केले.
माजी मुख्याध्यापिका सौ रोहिणी गायकवाड यांनी गुरुपौर्णिमा ते शिक्षक दिनापर्यंत कृतज्ञता निधी उपक्रम व प्रशालेच्या भौतिक सुधारणांविषयी माहिती दिली.
कृतज्ञता सोहळा सत्कारासाठीच्या अहवालाचे वाचन पर्यवेक्षक माननीय श्री शेखर जाधव यांनी केले. प्रातीनिधीक स्वरूपात खालील माजी विद्यार्थी व हितचिंतकाचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये श्री संदीप गुजर , सौ दर्शना संदीप गुजर, श्री शिवरत्न कुंभार, श्री ओंकार वारे, श्री दत्तात्रय सायकर, श्री सुनील देशपांडे ,श्री मयूर चव्हाण, श्री पराडकर अमित ,श्री श्रीकांत सिकची ,सौ रंजना सुर्वे श्री अमोल कावळे, श्री स्वप्निल मुथा, डॉक्टर श्री जे जे शहा, श्री रविंद्र मुथा, श्री सतीश पांडकर, श्री खारतोडे सर ,श्री झाडबुके सर ,श्री स्वप्निल शहा, श्री महेश पाठक, श्री अनपट सर, श्री मोने सर, सौ कल्पना गायकवाड यांच्या पुढाकाराने शाळेसाठी कृतज्ञता निधीच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुधारणांसाठी योगदान लाभले उदाहरण दाखल सांगायचे झाले तर एडव्होकेट श्री संजय श्रीकांत सिकची यांनी वैयक्तिक 25 बेंच, तर त्यांच्या वर्गमित्रांनी 25 बेंच प्रशालेस भेट दिले. तसेच श्री संदीप गुजर यांनी तत्कालीन माध्यमिक शिक्षण घेताना ज्या वर्गात बसायचे त्या वर्गाचे संपूर्ण नूतनीकरण करून दिले. त्याचे उद्घाटन 30 /6 /2025 रोजी नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी, शाला समिती अध्यक्ष माननीय श्री अजय पुरोहित, प्रशालेचे महामात्र माननीय डॉ. श्री गोविंद कुलकर्णी, स्थानिक सल्लागार समिती सदस्य माननीय श्री अशोक प्रभुणे, माननीय श्री राजीव देशपांडे, माननीय श्री फनेंद्र गुजर ,समन्वयक माननीय श्री पुरुषोत्तम कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री धनंजय मेळकुंदे ,माजी मुख्याध्यापिका माननीय सौ रोहिणी गायकवाड व प्रशालेचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेने त्या सर्वांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. माननीय मुख्याध्यापक श्री रामदासी राजाराम यांच्या कल्पनेतून व मार्गदर्शनाने मेळावा संकल्पना प्रत्यक्षात अवलंबली त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
शाला समिती अध्यक्ष माननीय श्री अजय पुरोहित यांनी शाळेची पूर्वीची इमारत यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. गतवर्षी कृतज्ञता निधी उपक्रमास साथ दिली त्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. यापुढेही माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती अशीच सद्भावना ठेवावी .त्यांच्या दातृत्वाने शाळेचा विकास व्हावा याबाबत मत व्यक्त केले.
स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य माननीय श्री अशोक प्रभुणे यांनी शाळेच्या माजी शिक्षकांची म्हणजेच बि. जी. घारे सर ,श्री
दामले सर , सौ वाटवे मॅडम यांची आठवण सांगताना सांगितले की ,त्यांनी परीक्षार्थी नाही तर खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवले अगाध ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे प्रशालेतील शिक्षकांच्या हातून अनेक नामवंत विद्यार्थी घडलेत ही परंपरा अशीच अविरत सुरू आहे याविषयी मत व्यक्त केले.
म. ए.सो च्या नियमक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब शिंदे यांनी संस्थापक नरहरी इंदापूरकर ,वामन भावे, वासुदेव फडके यांनी तळमळीने व कष्टाने संस्था स्थापन केली आहे.
त्याचप्रमाणे शिक्षण देण्याचे काम संस्थेत सुरू आहे आज शिक्षणाचे बाजारीकरण झालेले दिसते परंतु म.ए.सो.संस्थेने शिक्षणाचे कधीच बाजरीकरण होऊ दिले नाही .तळागाळातील विद्यार्थ्यांना देखील कमी व माफक खर्चात शिक्षण घेता यावे यासाठी संस्था सतत कार्यशील असते.
म. ए.सो.चे शिक्षक गुणवत्ता टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात .आपला विद्यार्थी शिकून मोठा व्हावा हाच उद्देश संस्थेचा आहे. यशस्वी माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून व शिक्षकांच्या सहयोगातून ही संस्था कार्यरत आहे. केवळ डिग्री देणारे शिक्षण न देता कौशल्यपूर्ण शिक्षण देणारी संस्था आहे. पूर्वीपासून आजही माजी विद्यार्थी हाच मोठा आधार आहेत. तेव्हा शाळेच्या भौतिक सुधारण्यासाठी शाळेच्या ऋणात राहून शाळेसाठी माजी विद्यार्थी, हितचिंतक यांनी सातत्यपूर्ण सहकार्य करावे ही भावना व्यक्त केली.
माननीय मुख्याध्यापक श्री धनंजय मेळकुंदे यांनी अथक निरंतर परिश्रमाने या शाळेचा स्वर्ग करू ही भावना व्यक्त केली व सर्वांचे आभार मानले.
स्वागत व परिचय श्रीमती सनगर सविता यांनी केले.
तर सूत्रसंचालन श्री सनदकुमार खोत यांनी केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने या थोर समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाला आदरांजली अर्पण केली जाते. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेणे आणि त्यांचा आदर्श कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे होते. यावेळी पर्यवेक्षक मा. श्री. श्याम नांगरे, ज्येष्ठ शिक्षक मा. श्री. अभिमन्यू गंभीरे, मा. श्री. रेवणनाथ मिसाळ उपस्थित होते. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे, अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणे, शोषित आणि वंचित घटकांसाठी शाळा स्थापन करणे अशा त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव प्रास्ताविका मधून श्री. विठ्ठल कापसे यांनी व्यक्त केला.
प्रमुख वक्ते मा. श्री. श्याम नांगरे यांनी महात्मा फुले यांचे जीवनचरित्र याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले. आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली, ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला." विविध गोष्टी मधून जीवनकार्याविषयी आढावा त्यांनी मनोगतातून व्यक्त केला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे यांनी, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखे आपण सुद्धा थोर काम केलं पाहिजे, आपणही त्यांच्या गुणांचा, आदर्श विचारांचा नक्कीच अंगीकार केला पाहिजे. माणसे उगीचच मोठी होत नसतात तर त्यांच्या कर्तृत्वामुळे समाज त्यांना शीर्ष स्थान देत असतो, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. अजयराव पुरोहित आणि महामात्र प्रा. डॉ. श्री. गोविंदजी कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
श्री. स्वप्नील गोंजारी यांनी महात्मा फुले यांच्या समग्र कार्याचा आढावा घेणारी कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. प्रशालेतील चि. राज बनकर, चि. आयुष चांगण, चि. अवधूत बाबर या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर भाषणे केली. ज्या विद्यार्थ्यांनी ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरती भाषणे केलेली होती, त्या उत्कृष्ट भाषणांना प्रोत्साहनपर भेट म्हणून पेन विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. गिरीश कदम यांनी केले, आभार श्री. सनतकुमार खोत यांनी मानले.

गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी प्रशालेत मुलांच्या दुपार विभागात पालक शाळा उत्साहात संपन्न.
पालक शाळेची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. योगशिक्षक मा. श्री. दादासाहेब शिंदे सर यांनी योग आणि ध्यान धारणेचे महत्व सांगितले.प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. धनंजय मेळकुंदे सर पालक शाळेच्या अध्यक्षस्थानी होते.प्रशालेचे मुलांच्या दुपार विभागाचे पर्यवेक्षक मा. श्री. शेखर जाधव सर यांनी सर्व शिक्षक वृंदांची ओळख करून देत उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.
इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातील विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर वर्गवार वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. पालक शाळेला 119 पालक उपस्थित होते
म.ए.सो. चे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी २० डिसेंबर, २०२५ रोजी फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित पुणे बुक फेस्टिव्हल ला भेट दिली. १३ डिसेंबर रोजी नॅशनल बुक ट्रस्टने पुणे बुक फेस्टिव्हल आयोजित केला होता. हा बुक फेस्टिव्हल ९५० हून अधिक स्टॉल्ससह एका विस्तीर्ण परिसरात पसरलेला होता. प्रत्येक स्टॉलमध्ये काल्पनिक आणि गैर-काल्पनिक, विश्वकोश, विज्ञान, समाजशास्त्र, तत्वज्ञान, धर्म, आत्मचरित्र, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि मराठी साहित्य, शब्दकोश, पौराणिक कथा, पाककृती, कविता, नाटक, ग्राफिक कादंबऱ्या यासारख्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन होते.
पुस्तक फेस्टिव्हलला भेट देऊन विद्यार्थ्यांनी पुस्तक ब्राउझिंग, वाचन आणि पुस्तके खरेदी करण्याचा आनंद घेतला. पुस्तके वाचल्याने ज्ञानाच्या प्रदर्शनाचे जग समृद्ध होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली होती. शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. अजयराव पुरोहित आणि महामात्र प्रा. डॉ. श्री. गोविंदजी कुलकर्णी यांनी पुस्तक महोत्सव क्षेत्रभेट निमित्त शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश हा होता की लोप पावत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे, त्यांना पुस्तकांकडे परत आणणे आणि त्यांच्या हातात त्यांचे मित्र म्हणून पुस्तकाला देणे होय. मोबाइल, टॅबच्या युगातही पुस्तके वाचली जावीत, पुस्तकप्रेम वाढावे, यासाठी ही पुस्तक महोत्सवास भेट महत्वपूर्ण ठरली. या क्षेत्रभेटीचे संयोजन प्रशालेतील शिक्षक श्री. स्वप्निल गोंजारी यांनी केले होते.

म ए सो चे कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बारामती जिल्हा पुणे येथे २३ जुलै २०२५ रोजी भारतीय मानक ब्युरो बी.आय.एस क्लब उपक्रम क्रमांक-१ मानक लेखन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता नववी आणि दहावीच्या १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शक श्री. संजय आटोळे यांनी केले. त्यांच्या प्रस्तावनेत बी. आय.एस. उद्दिष्ट, मानके लेखन, उद्दिष्ट, मानके, संस्थेचे वैशिष्ट्य आणि ते कशासाठी वापरले जातात याबद्दल मार्गदर्शन केले. शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री. धनंजय वसंतराव मेळकुंदे यांनी क्लबद्वारे ग्राहकांच्या जागरूकतेबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी क्लबद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. स्पर्धेच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
मानक लेखनाच्या पारितोषिक विजेत्यांचे तपशील खाली दिलेला आहे
23 जुलै 2025 रोजी स्पर्धा कार्यक्रम:
क्रमांक १-आयुष हरीश चांगण, अवधूत बजरंग बाबर, यश परशुराम गोसावी
क्रमांक 2-अवंतिका हनुमंत पवार, गायत्री लालासो निंबाळकर, वेदिका नंदकिशोर शिंगणे
क्रमांक 3- राज वीरसेन बनकर, श्रीहरी शिवाजी मोरे
उत्तेजनार्थ बक्षीस- श्रुतिका संदिप कालगावकर, वैभवी सोपानदेव काकडे
भारतीय मानक ब्युरो राष्ट्रीय स्तर ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा इयत्ता 9 वी ते 12वी 5 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धे मध्ये श्रीहरी शिवाजी मोरे इयत्ता -10 वी विशाळगड या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
भारतीय मानक ब्युरो राष्ट्रीय स्तर ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा 31 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या स्पर्धेमध्ये कु. साळुंके जान्हवी संग्राम इयत्ता 10 -वी सरस्वती या विद्यार्थिनीने पारितोषिक प्राप्त केले.
भारतीय मानक ब्युरो पुणे शाखा कार्यालय अंतर्गत 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 व्हिजिलन्स अवरनेस दक्षता जनजागृती पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथमेश कुलट इयत्ता 9 वी सिंहगड या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.

भारतीय मानक ब्युरो राष्ट्रीय स्तर ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा इयत्ता 9 वी ते 12वी 5 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धे मध्ये श्रीहरी शिवाजी मोरे इयत्ता -10 वी विशाळगड या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
भारतीय मानक ब्युरो राष्ट्रीय स्तर ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा 31 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या स्पर्धेमध्ये कु. साळुंके जान्हवी संग्राम इयत्ता 10 -वी सरस्वती या विद्यार्थिनीने पारितोषिक प्राप्त केले.
भारतीय मानक ब्युरो पुणे शाखा कार्यालय अंतर्गत 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 व्हिजिलन्स अवरनेस दक्षता जनजागृती पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथमेश कुलट इयत्ता 9 वी सिंहगड या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.

"पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत विद्यार्थ्यांचा सहभाग."
बारामती (दि. २७ ऑगस्ट, २०२५) : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना मंगलमय वातावरणात व मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
प्रशालेच्या प्रांगणात विद्यार्थी व शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत ढोल-ताशा व "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात गणेशमूर्ती विद्यालयात आणण्यात आली. वेदमंत्रोच्चाराच्या गजरात पूजा-विधी करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे सर, सर्व शिक्षकवृंद व सेवक उपस्थित होते.
प्राणप्रतिष्ठेनंतर विद्यार्थ्यांनी भावगीत, स्तोत्रपठण सादर करून वातावरण अधिकच भक्तिमय केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती आणि हरितदूत बनण्याचा संदेश देण्यात आला.
गणेशोत्सवानिमित्त शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री. अजय जी पुरोहित सर आणि प्रशालेचे महामात्र मा. डॉ. श्री. गोविंद जी कुलकर्णी सर यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रशालेत सांस्कृतिक विभागाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसादाचे वाटप करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष, शंखनाद आणि टाळ्यांच्या गजरात विद्यालयात गणेशोत्सवाचा शुभारंभ श्रद्धा, भक्ती व उत्साहाच्या वातावरणात झाला.
पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण आंतर शालेय नाट्य स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कै.गजानन भिवराव देशपांडे विद्यालयाची "उलगुलाल" ही हिंदी एकांकिका तालुक्यात पहिली आली. उलगुलाल या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीला उलथून टाकण्यासाठी व आदिवासींमध्ये देशप्रेम स्वाभिमान,जागृत करण्यासाठी बिरसा मुंडा यांनी केलेले प्रयत्न,त्यांचे बलिदान याचे ज्वलंत चित्रण या एकांकिकेतून दाखवले असून या एकांकिकेची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या नाटकात श्रेयस कदम, प्रद्युत गडकर , संस्कार साळुंके, प्रतिक पाडवी, राजवीर गावडे , वेदांत देशमुख, आर्यन गायकवाड , यश येकाळे, राजवर्धन कदम, आर्यन देवकाते, ओंकार मुरूमकर, इंद्रनील बागडे, तन्मय चव्हाण, आयुष काटकर, अनिरुद्ध दुरुगकर, स्वराज केसकर या विद्यार्थ्यांनी अभिनय केला.
या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन रवींद्र गडकर यांनी केले. प्राचार्य धनंजय मेळकुंदे उपमुख्याध्यापिका सविता हिले, पर्यवेक्षक शेखर जाधव , श्याम नांगरे यांनी अभिनंदन केले. प्रशालेचे शालासमितीचे अध्यक्ष अजय पुरोहित, महामात्र गोविंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

नमस्कार..

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले.
विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ (मुलांचा दुपार विभाग) हा केवळ एक शालेय उपक्रम न राहता संस्कार, विचार आणि मूल्यांची जाणीव जागवणारा दीपोत्सव ठरला.
या समारंभातून प्रशालेची शैक्षणिक दृष्टी, सांस्कृतिक जडणघडण आणि राष्ट्रभक्तीची मूल्यपरंपरा समर्थपणे व्यक्त झाली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. ज्ञानदेवतेच्या चरणी नतमस्तक होताना शिक्षणाचा खरा अर्थ केवळ पुस्तकी प्रगती नसून विवेक, शिस्त आणि चारित्र्यनिर्मिती आहे, हा संदेश अधोरेखित झाला.
ईशस्तवन व स्वागत गीत प्रशालेतील संगीत शिक्षिका कु. रसिका सुर्वे व विद्यार्थिनींनी अत्यंत भावपूर्ण शैलीत सादर करून उपस्थितांच्या मनात भक्ती आणि सौंदर्य यांचे सुरेल नाते निर्माण केले.
प्रास्ताविकातून स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष मा. श्री. सोमनाथ गावित यांनी, प्रशालेच्या कार्यसंस्कृतीचा वैचारिक पाया उलगडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, प्राविण्य प्राप्त व्हावे यासाठीच वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असतो हे सांगितले. विद्यार्थ्यांकडे केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि कष्ट करण्याची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे, असे मत त्यांनी मांडले.
अहवाल वाचनात पर्यवेक्षक श्री. शेखर जाधव यांनी प्रशालेतील उपक्रमांची सुसूत्र मांडणी करत संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचे प्रभावी दर्शन घडविले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रशालेचे माजी विद्यार्थी व आयटी क्षेत्रातील यशस्वी व्यवस्थापक मा. श्री. तेजस देशमुख यांनी, विद्यार्थ्यांना स्वप्न पाहण्याची दृष्टी, कष्ट करण्याची तयारी आणि मूल्यांशी निष्ठा ठेवण्याचा प्रेरणादायी मंत्र दिला. कोणत्याही क्षेत्रासाठी कौशल्य मिळवणे आवश्यक असून, असलेल्या कौशल्यात वाढ करण्यासाठी मेहनत करा, हा प्रात्यक्षिकाद्वारे संदेश दिला.
यावेळी त्यांनी प्रशालेतील जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी इथून पुढील काळात, स्पर्धात्मक युगात चांगले संस्कार आणि नागरिक म्हणून घडण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतातून प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे यांनी प्रशालेचा शिक्षणविषयक तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन स्पष्ट करत “विद्यार्थी घडविणे म्हणजे राष्ट्र घडविणे” हा विचार प्रभावीपणे मांडला. तसेच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होते. मनासारखे छंद पूर्ण झाल्याने येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यासात त्यांची एकाग्रता वाढते. स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक 'पर्वणी' च असते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
या स्नेहसंमेलनाची संकल्पना स्वदेशी, स्वभाषा, आत्मनिर्भर भारत, आपली परंपरा व पर्यावरण संरक्षण या कालसुसंगत आणि राष्ट्रनिर्मितीस पोषक मूल्यांवर आधारित होती. विविध गुणदर्शन कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांनी केवळ कला सादर केली नाही, तर विचारांची मशाल पेटवली. प्रत्येक सादरीकरणातून प्रशालेतील विद्यार्थ्यांची वैचारिक प्रगल्भता, शिस्तबद्ध सादरीकरण आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून आले.
यावेळी मराठी, इंग्रजी, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विज्ञान आणि भूगोल प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
पारितोषिक प्राप्त विजेत्या विद्यार्थ्यांना आज मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले, स्नेहसंमेलन प्रमुख श्रीमती उज्वला कुंभार, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. शेखर जाधव व विद्यार्थी प्रतिनिधी चि. सागर चौहान यांच्या उपस्थितीने व्यासपीठ शोभून गेले. सूत्रसंचालन श्री. विठ्ठल कापसे यांनी अत्यंत नेटकेपणाने व वैचारिक सुसूत्रतेने केले. मान्यवरांचा परिचय व स्वागत श्री. मगन पाडवी यांनी प्रभावी शब्दांत केले, तर विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री. श्रीयश सकोजी यांनी आपल्या अमोघ वाणीतून केले. समारोपप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री. सुरेश शिंदे यांनी केलेल्या आभारप्रदर्शनातून कृतज्ञतेची संस्कृती प्रत्ययास आली.
विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त आणि बहुसंख्य उपस्थितीमुळे हा समारंभ अधिकच अर्थपूर्ण ठरला. एकूणच हा गुणदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेची, सांस्कृतिक समृद्धीची आणि मूल्याधिष्ठित शिक्षणपरंपरेची उज्ज्वल साक्ष ठरली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाची दूरदृष्टी यांचे हे यशस्वी फलित असून, प्रशालेची ही वाटचाल नक्कीच समाजाला आणि राष्ट्राला दिशादर्शक ठरेल, अशी गौरवपूर्ण भावना उपस्थितांच्या मनात ठसठशीतपणे उमटली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि ज्ञानसागर स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि ज्ञानसागर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे होते. यावेळी पर्यवेक्षक मा. श्री. श्याम नांगरे, मा. श्री. शेखर जाधव, ज्येष्ठ शिक्षक मा. श्री. संजय आटोळे, मा. श्री. प्रशांत सोनवणे उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ यांनी आदर्श राजा घडवला, तर स्वामी विवेकानंद यांनी आदर्श नागरिक घडवण्याचा संदेश दिला. या दोघांचे जीवन आपल्याला सांगते की, मजबूत राष्ट्र घडवायचे असेल तर संस्कार, आत्मविश्वास आणि सेवा भावना आवश्यक आहे, त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव प्रास्ताविका मधून श्री. विठ्ठल कापसे यांनी व्यक्त केला.
प्रमुख वक्ते श्री. संजय आटोळे यांनी "राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माताच नव्हे, तर त्या एका महान राष्ट्रपुरुषाच्या घडणाऱ्या शिल्पकार होत्या. त्यांनी शिवरायांना लहानपणापासून रामायण, महाभारत आणि स्वराज्याची स्वप्ने सांगितली. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, धर्म, न्याय व स्वाभिमान जपणे—हे संस्कार त्यांनी शिवरायांच्या मनात रुजवले. म्हणूनच राजमाता जिजाऊ या केवळ एका राजाच्या आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या जननी होत्या. त्यांच्या त्यागातून, धैर्यातून आणि संस्कारातून एक आदर्श राजा घडला.
दुसरीकडे, स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारताचे महान विचारवंत होते. त्यांनी तरुणांना आत्मविश्वासाचा मंत्र दिला— “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.” त्यांनी भारताला जगासमोर अभिमानाने उभे केले. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नसून, मानवतेची सेवा हाच खरा धर्म आहे, हे त्यांनी शिकवले. युवकांमध्ये देशभक्ती, चारित्र्य आणि आत्मबल निर्माण करणे, हेच त्यांचे खरे कार्य होते.
राजमाता जिजाऊ यांनी कर्मातून राष्ट्र घडवले, तर स्वामी विवेकानंदांनी विचारातून राष्ट्र जागे केले," विविध गोष्टींमधून जीवन कार्याविषयी आढावा त्यांनी मनोगतातून व्यक्त केला.
प्रमुख अतिथी मा. श्री. प्रशांत सोनवणे यांनी "आजच्या तरुण पिढीने राजमाता जिजाऊ यांच्याकडून धैर्य व त्याग शिकावा आणि स्वामी विवेकानंदांकडून आत्मविश्वास व देशप्रेम शिकावे. आपण असे केले, तरच खऱ्या अर्थाने भारताचे उज्ज्वल भविष्य घडेल," असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
"राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान जागतिक दर्जाचे आहे! बाल शिवाजी यांच्या माध्यमातून जिजाऊ माँसाहेब यांनी जगात आदर्श मानल्या जाणाऱ्या राज्याची निर्मिती केली; तर स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्मातील विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली!” असे विचार प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे यांनी व्यक्त केले.
शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. अजयराव पुरोहित आणि महामात्र प्रा. डॉ. श्री. गोविंदजी कुलकर्णी यांनी 'राजमाता जिजाऊ आपल्याला शिकवतात की, आईने दिलेले संस्कार खूप महत्त्वाचे असतात. म्हणूनच आपण राजमाता जिजाऊंचा
आदर करायला हवा आणि स्वामी विवेकानंदांचे स्वप्न असलेला सशक्त, आत्मविश्वासी भारत घडविण्याचा तसेच धैर्यवान, मेहनती आणि चांगले नागरिक बनण्याचा संकल्प व्यक्त केला.
विद्यार्थ्यांमधून चि. आयुष चांगन आणि चि. साईराज डोईफोडे यांनी भाषणे केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि. अवधूत बाबर याने केले तर आभार चि. दक्ष खांटेर याने मानले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी विशाळगड आणि सिंहगड मधील विद्यार्थ्यांनी केले होते.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*युवा चेतना दिवस व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी*
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै.ग.भि. देशपांडे विद्यालय बारामती मुलींच्या दुपार विभागात युवा चेतना दिवस व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
चेतना दिवस म्हणजे १२ जानेवारी, जो स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश तरुणांना त्यांच्या विचारांनी प्रेरणा देऊन राष्ट्र निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम यांनी भूषविले. याप्रसंगी प्रमुख वक्ते सौ. अनिता सावंत व सौ. रूपाली जगताप तसेच ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. सनगर मॅडम मंचावर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी संगीत शिक्षिका कु. रसिका सुर्वे यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेया पिसाळ या विद्यार्थिनीने केले. तर विद्यार्थी मनोगतात हेमाक्षी लोंढे या विद्यार्थिनीने स्वामी विवेकानंदांचे कार्य विद्यार्थिनी समोर मांडले. तर जानवी रणदिवे या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल सखोल माहिती दिली.
प्रमुख वक्त्या सौ. अनिता सावंत मॅडमने स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देताना स्वामी विवेकानंद यांनी दिलेला संदेश *उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका'* तरुणांसाठी महत्त्वाचा आहे.
हे या ठिकाणी नमूद केले.
सौ. रूपाली जगताप मॅडमने राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल त्या केवळ माता नव्हत्या, तर रयतेच्या माता होत्या, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य सोडले नाही आणि शिवरायांना खंबीर पाठिंबा दिला. असे विचार मांडले.
अध्यक्षीय मनोगतात उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम यांनी स्वामी विवेकानंद हेएक भारतीय संन्यासी, तत्त्वज्ञ आणि रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते, ज्यांनी वेदांत आणि योगाचे ज्ञान पाश्चात्य जगाला दिले, शिकागो येथील 'जागतिक धर्म परिषदेत ऐतिहासिक भाषण दिले, मानवसेवा व शिक्षणातून राष्ट्र उभारणीचे कार्य केले. त्यांच्या विचारांनी तरुणांना प्रेरणा दिली आणि 'मानवसेवा हीच ईश्वरसेवा' या तत्त्वज्ञानावर त्यांनी भर दिला. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे केतकी व कदम दुर्वा तर आभार प्रदर्शन अनुष्का नांगरे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाची सर्व जबाबदारी इयत्ता नववी गोदावरी या वर्गातील विद्यार्थीनींनी पार पाडली. वर्गशिक्षिका श्रीम. सनगर सविता यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. मेळकुंदे सर, शाळा समिती अध्यक्ष श्री. पुरोहित सर व महामात्र श्री गोविंद कुलकर्णी सर यांचे प्रोत्साहन लाभले.


"शिक्षणातून व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या परंपरेचा गौरव; विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान."
प्रमुख अतिथी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, माजी विद्यार्थी मा. श्री. संजय संघवी यांचे उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. मान्यवरांनी सरस्वती पूजन व संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन केले.
ईशस्तवन व स्वागतगीत कु. रसिका सुर्वे व विद्यार्थिनींनी सादर केले.
प्रास्ताविकामधून स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष श्रीमती. उज्वला कुंभार यांनी 'विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची पोचपावती म्हणजे पारितोषिक वितरण होय. सतत केलेले कष्ट व आत्मविश्वास यामुळे यश प्राप्त होते. त्याचप्रमाणे पालक - विद्यार्थी - शिक्षक यांच्या समन्वयामुळे शाळेचा विकास होतो, असा मनोदय व्यक्त केला.
प्रमुख अतिथी मा. श्री. संजय संघवी यांनी प्रशालेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, उच्च दर्जाचे शिक्षण व संस्कार ही या शाळेची वैशिष्ट्ये आहेत. शिक्षणातून आपण स्वतःचा आणि समाजाचा विकास साधायचा आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील शिक्षकांबरोबर आलेले अनुभव सांगितले, तसेच परिश्रम व कठोर मेहनत घेतल्याशिवाय यशाचे शिखर गाठले जात नाही, असा संदेश विद्यार्थ्यांना यावेळी दिला.
दुसरे प्रमुख अतिथी, प्रशालेचे माजी विद्यार्थी मा. श्री. मयूर कांबळे ( डेप्युटी कमिशनर, इन्कम टॅक्स) म्हणाले की, शाळेचा नावलौकिक आजही टिकून आहे. प्रशालेत आल्यावर आदर, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मिळतो. शाळा हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे, जीवनात यशस्वी होण्यासाठी शाळेतले शिक्षक, मित्र महत्त्वाचे आहेत. चांगले छंद जोपासा आणि खेळात आवड निर्माण करा, असा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केला. चित्रकला, प्रयोग आदी उपक्रमातील विद्यार्थ्यांचे कौतुक करून, त्यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतामध्ये, प्रशालेचे महामात्र प्रा. डॉ. श्री. गोविंदजी कुलकर्णी यांनी "प्रशालेतील माजी विद्यार्थी आपल्यासमोर आदर्श निर्माण करतात, यातून शाळेचे व्यक्तिमत्व घडत नाही तर व्यक्तीत्व घडत आहे. अनेक संस्कारांनी परिपूर्ण आपली प्रशाला आहे." तसेच 'पंच-परिवर्तन’ या संकल्पनेतील पाच आधारस्तंभ म्हणजे, नागरिक कर्तव्य व शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचार व संकल्पना, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण. हे सर्व स्तंभ एकमेकांना पूरक असून एकत्रितपणे ते समाजात सशक्त बदल घडवण्याचे सामर्थ्य बाळगतात, असा मनोदय त्यांनी व्यक्त करत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. अजयराव पुरोहित यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक यशाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे यांनी विद्यार्थ्यांच्या बहुआयामी गुणविकासाबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ज्ञान, संस्कार व कर्तृत्वाच्या बळावर विद्यार्थी समाजाचे सक्षम नागरिक घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त केली. तालुका पातळी पासून राष्ट्रीय पातळी पर्यंत प्रशालेतील विद्यार्थ्याच्या यशाचा चढता आलेख अहवाल वाचनातून प्रकट केला.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले, समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष श्रीमती उज्वला कुंभार, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. शेखर जाधव, प्रभारी पर्यवेक्षक श्री. शशिकांत खताळ, क्रीडाध्यक्ष श्री. अनिल गावडे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता तावरे हेही उपस्थित होते.
दरम्यान पाककला कार्यक्रमास प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी तसेच ॲड. सौ. ऐश्वर्या कुलकर्णी उपस्थित होत्या.
तसेच विभागवार झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉ. विशाखा पाटील (एमडी मेडिसिन, बुधरानी हॉस्पिटल पुणे), प्रथितयश व्यापारी श्री. प्रदीप दोषी, सौ. दिव्या धालपे (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पाटबंधारे विभाग पुणे), कु. स्वरांजली गायकवाड (वरिष्ठ लिपिक, पोलीस कमिशनर कार्यालय पुणे), व्यवस्थापक श्री. तेजस देशमुख, समन्वयक श्री. पुरुषोत्तम कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विविध गुणदर्शन कार्यक्रमात स्वदेशी, स्वभाषा, आत्मनिर्भर भारत, आपल्या परंपरा व पर्यावरण संरक्षण या विषयांवर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कार्यक्रम सादर केले. विभागवार कार्याध्यक्ष म्हणून श्री. ऋषिकेश बुलाख, श्री. विनायक गोसावी, सौ. मेधा चिंधे, श्री. सोमनाथ गावित, सौ. प्रगती पाटील, सौ. रेवती झाडबुके यांनी काम पाहिले. तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कु. शर्वरी यादव, कु. शर्वरी मराठे, कु. सना बागवान तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून चि. वेदांत भागवत, चि. सागर चौहान यांना सन्मान मिळाला.
यानिमित्ताने स्थानिक सल्लागार समिती सदस्य श्री. राजीव देशपांडे, श्री. जवाहर वाघोलीकर, श्री. फणेंद्र गुजर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी दहावी, बारावी, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रशालेतील आदर्श शिक्षक परितोषिक श्री. श्रीयश सकोजी आणि श्री. हरिदास राऊत यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
त्याचप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन (२०२५-२०२६) निमित्ताने शिक्षकांसाठी कै. म. गो. घारे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये श्री. रवींद्र गडकर, सौ. मनीषा श्रीमंत, श्री. सोमनाथ गावित या
स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन श्री. संतोष शेळके यांनी केले. परिचय व स्वागत सौ. मेधा चिंधे यांनी केले. तसेच पारितोषिकांचे वाचन श्री. हरिदास राऊत यांनी केले.
श्री. राहुल पोथरकर यांनी आभार मानले.
शिक्षणसंस्था जर सातत्याने ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्व यांचा समन्वय साधत राहिल्या, तर समाज सुदृढ, समतावादी आणि मूल्याधिष्ठित होईल.
देशपांडे विद्यालयातील हा समारंभ म्हणजे शिक्षणाच्या या व्यापक तत्त्वज्ञानाची जिवंत अनुभूती होती जिथे यशाला नम्रतेची जोड, बुद्धीला करुणेची साथ आणि प्रगतीला सामाजिक बांधिलकीची दिशा मिळाली.




























