बारामतीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी
बारामती, दि. ६ जुलै : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय, बारामती येथील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली आहे.इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी एकूण ११५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी पात्र ठरले असून विद्यालयाचा निकाल ६९.५७ टक्के लागला आहे. यामधील १४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता आठवीच्या परीक्षेत ५८ विद्यार्थी पात्र ठरले असून विद्यालयाचा निकाल ५०.०० टक्के लागला आहे. त्यापैकी ३० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली असून अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक
सकाळ विभाग (मुले) : श्री. बरळ सर, श्री. जगताप सर
सकाळ विभाग (मुली) : श्री. शेळके सर, श्री. वसावे सर
इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक
श्री. गंभीरे सर, श्री. गडकर सर, श्री. राठोड सर, सौ. मोहिते मॅडम, सौ. चिंधे मॅडम, श्रीमती सनगर मॅडम आणि श्री. गायकवाड सर, शाला समिती अध्यक्ष. श्री अजयजी पुरोहित सर व महामात्र. डॉ गोविंद कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक सर्व पर्यवेक्षक, शाला समिती तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या यशाबद्दल पालक व परिसरातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

